h2>Dating : वरचढ ( Superior )

मुंबईच्या उपनगरातील किराणा मालाचे दुकान. समोर काऊंटर आणि मसाल्याची छोटी पाकिटे लटकलेली. काऊंटरवर एका बाजूला फरसाण,शेव,भावनगरी च्या बरण्या. दुसर्या बाजूला वजन काटा. खाली पॅकिंगसाठी ठेवलेल्या प्लॅस्टिक पिशव्या. मागे धान्याची पोती , साखर , पोहे ,रवा , सुटी कणीक , सुटे तेल असं बरच काही. हे सगळं जितकं कळकट असू शकतं त्यापेक्षा जास्त कळकट आहे. जमिनीवर खूप काही सांडलेले ; जणू कधी साफ केले नसावे. काऊंटरवर तेल पुसलेले कागद आणि तसेच एक कळकट फडके.
शेठ टिपिकल नाहीये. टिपिकल शेठ बाजूच्या भिंतीवर फोटोमध्ये बंदिस्त आहे. सध्या आहे तो टी-शर्टवाला .एका हातात स्मार्ट फोन दुसर्या हाताने लाडक्या कुत्र्याला गोंजारणे हा शेठचा आवडता उद्योग . दुकानातल्या दोन पोर्यांवर त्याची बारीक नजर आहे. कुणी गिह्राइकाला धान्य देताना सांडलवंड करत आहे वा आट्याची नासाडी चालू आहे वा तेल देताना निष्काळजीपणे जमिनीवर सांडत आहे याकडे त्याचे लक्ष आहे . या दोन मुलांवर तोंडसुख घेणे हा अजून एक आवडता छंद .
दुकानातली दोन पोरे सतत भिजल्या मांजरीगत घाबरून , अंग चोरून , शेठचा ओरडा खावा लागणार नाही अशा बेताने धाकात , दहशतीत दिवस ढकलत आहेत. चेतनला भीती आहे ती पगार कापला जाण्याची ; चुकीला शिक्षा केली तर एकवेळ चालेल पण पगार कापला तर गावी घरी १३ जणांचे कुटुंब काय करेल याची. ती मजबूरी त्याला खाली मान घालून काम करण्यास भाग पाडत आहे.
उसे याद है वो पहला दिन जब ट्रेनसे उतरनेके बाद उसने इतना बडा स्टेशन देखा था | बडी सडके , चकाचोन्ध इमारते , रंगबिरंगी भीड इन सबसे गुजरते हुए चाचाने उसे दुकानपर छोडा था | बस इतनीही बंबई है उसकी…बाकी चार महीने दुकान सबकुछ है | खाना , सोना और जीना सब वहीपे | जिंदगी मानो सेठ की डांट और पैसेकी मजबूरीमे सिमट गयी है |
गाँवमे वो सबसे होशियार था | कोई भी काम निकलता तो लोग उसे बुलाते और उसे भी बडा मजा आता करनेमे | यही खूबी जानकर चाचा उसे बंबई लेके आये थे | उसकी नजर बहुत तेज थी और समझ भी | दुकानका काम जल्द सिखा था उसने | उसकी गलती ना होनेपर भी सेठ बारबार चिल्लाता ;उसकी आंखोंमे खून खौलने लगता था | फिर अचानक माँ बाप की याद आती , उसकी लाडली छोटी बहन पिलु की याद आती ; और वो अपना गुस्सा निगल देता | मुझे गालीया और कुत्ते को इतना प्यार ?
पैसा है तो सबकुछ है — उसे समझने लगा था | सेठ के पास पैसा है , घर है , अच्छे कपडे है , पुरानी ही सही लेकिन एक मोटरसाईकल है ….. और स्मार्ट फोन है ! मुझे क्या करना चाहिये ये सब पानेके लिये? वो सोचता रहता | क्या है मेरे पास ?
“ चेतन इधर आ ”
“ बैठ , मेरे साथ खेल | ” फोनवर गेम खेळायला सेठला कुणीतरी पार्टनर पाहिजे होता. दुपार असल्याने दुकानात गर्दी नव्हती आणि चेतन त्याला हक्काचा खेळाडू वाटला — हमखास हरेल असा.
“लेकिन मुझे कुछ मालूम नही कैसे खेलते है ”
“ मै बता रहा हूँ …. तू इधर तो आ | ” दोनच मिनिटात त्याला गेम समजला. आता तो आणि सेठ …. दुकानात आलेल्या एखाद्या चुकार गिह्राइकाला दुसरा पोर्या सामान बांधून देत होता…. गेम रंगात आला होता ….दोघे आता प्रतिस्पर्धी होते …..तुल्यबळ ….. कुणालाच हरायचे नव्हते ….आणि सेठ जोरात ओरडला — ओह शsशिsटXXXXXX
त्याच्या कोवळ्या मिसरुडावर हलके हसू फुटले. स्वप्नं अलगद डोळ्यात उतरली .
क्यूंकि उसके पास दिमाग था !
This is the second story in a series called Kasturi.